लंडन – पंजाबचे महाराज रणजितसिंह यांची पत्नी महाराणी जिंदन कौर यांच्या दागिन्यांचा लिलाव लंडन येथे झाला. संबंधित सर्व दागिने जिंदन कौर यांची मोठी नात प्रिंस बांबा सुथरलैंड यांच्याजवळ आहेत. लिलाव करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये सोने तसेच चांदी जडीत हार तसेच अन्य आभूषण समाविष्ट आहेत. ६२,५०० पाउंड अर्थात ६० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला लिलाव करण्यात आला.
आठवड्याभरात लंडन येथे आयोजित ‘बोहमास इस्लामिक एंड इंडियन आर्ट सेल’ येहे दागिन्यांचा लिलाव करण्यात आला. जिंदन कौर यांनी पंजाब येथील इंग्रजांच्या घुसखोरीला तीव्र विरोध केला होता, मात्र त्यांना देखील आत्मसमर्पण करावे लागले होते. त्यानंतर लाहोर येथील महाराजांच्या खजिन्यातून ६०० पेक्षा जास्त दागदागिने जप्त करण्यात आले होते.
महाराणी कौर यांना १८४८मध्ये तुरुंगात डांबण्यात आले होते. लंडन येथील लिलावात १९व्या शतकातील अनेक दुर्मिळ वस्तूंचा लिलावा करण्यात आला. मुलासह लंडन येथे वास्तव्य करण्यास अनुमती दिल्यावर महाराणी कौर यांना ब्रिटिश सरकारने सर्व दागीने परत दिल्याचे लिलाव कंपनीचे प्रमुख ऑलिवर व्हाइट यांनी सांगितले. सध्या या लिलावाची जगभर चर्चा होत आहे.