नवी दिल्ली : एकेकाळी दूरदर्शनवरील रामायण, महाभारतसारख्या मालिका खूपच गाजल्या होत्या. सध्याच्या काळात या पूर्वीच्या मालिकांची सोशल मीडियावर आपल्याला एक क्लिप पाहायला मिळाली तर प्रेक्षक खूप उत्साही होतात आणि त्याची छोटीशी झलक त्यांना भूतकाळाच्या आठवणीत घेऊन जाते. महाभारत मालिकेत दुर्योधनच्या भूमिकेत अभिनेता पुनीत इस्सर यांनी सर्वांची मने जिंकली होती. मात्र, पुनीतचा दुर्योधन होण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्यावेळी महाभारतातील या पात्राची निवड करण्यासाठी पाच हजार ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यातून ही निवड करण्यात आली.
भारतीय टेलीव्हिजनच्या इतिहासात दूरदर्शनला वेगळे स्थान आहे. तसेच यावरील प्रसारित होणार्या मालिकांचा एक वेगळा दर्जा आहे. पूर्वी दूरदर्शनवर दाखवल्या जाणार्या मालिका आगळ्यावेगळ्या होत्या, त्यात मोगली, विक्रम वेताळ किंवा रामायण आणि महाभारत या संस्कृती आणि पौराणिक कथेशी संबंधित मालिका असे. सर्व लोक मोठ्या उत्साहाने सर्व मालिका पाहात असत. त्यावेळी मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कोणतेही भाग संपूर्ण कुटुंब टीव्ही पडद्यावर एकत्र बसून पाहात असे. या मालिकांच्या पात्रांमध्ये जणू काही जादू होती. महाभारतातील काही पात्र खूपच प्रसिद्ध झाले, त्यापैकी एक पात्र दुर्याेधनाचे होते.
ज्याच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आणि ते चर्चेत राहिले.
दुर्योधनच्या भूमिकेत अभिनेता पुनीत इस्सर होते. या दुर्योधनच्या भूमिकेने त्यांनी सर्वांची मने जिंकली. त्यानंतर जेव्हा जेव्हा दुर्योधनाचा उल्लेख झाला तेव्हा पुनीतची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात उमटली. पण, पुनीतचा दुर्योधन होण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्यावेळी महाभारतातील पात्रांची निवड करण्यासाठी पाच हजार ऑडिशन्स घेण्यात आल्या. इतक्या ऑडिशन मिळवणे खूप मोठी गोष्ट होती. कारण तेव्हा,आजच्याप्रमाणे कलाकारांनाही इतकी क्रेझ नव्हती. मात्र, या पाच हजार लोकांमध्ये जेव्हा पुनीत दुर्योधनची भूमिका मिळाली तेव्हा तो खूश नव्हता, परंतु यासाठी त्याला बरीच तयारी करावी लागली. कारण ही भूमिकेत देण्यास निर्माते तयार नव्हते.
कारण पुनीत इस्सर हाच अभिनेता होता, ज्याच्याकडून कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चनला चुकून मार बसला आणि बिग बी याला हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते. त्यावेळी अमिताभच्या तब्येतीविषयी खूप चर्चा झाली होती. कारण तो जवळजवळ मृत्यूच्या दारात पोहोचला होता. यानंतर पुनीतला बाहेर फेकण्यात आले. त्यावेळी, पुनीतेने नुकतीच आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. मात्र, ही दुर्घटना घडल्याने कोणीही त्याला काम देण्यास तयार नव्हते. विशेषत: त्याला खलनायकाची भूमिका अजिबात मिळत नव्हती. त्यामुळेच महाभारताच्या निर्मात्यांनासुद्धा त्याला दुर्योधनची भूमिका द्यायची इच्छा नव्हती. याउलट महाभारतात भीमच्या व्यक्तिरेखेसाठी त्याला अचूक मानले जात होते. एकदा त्याने मुलाखतीत सर्वांच्या समोर दुर्योधनचे जोरदार संवाद म्हटल्याने सर्वांना खात्री झाली आणि शेवटी त्यांनी मला दुर्योधन म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे महाभारत मालिकेला दुर्योधनला भेटला.