नाशिक – राज्यातील सर्वात कमी तपामानाची नोंद रविवारी नाशिकमध्ये झाली आहे. त्यामुळे नाशिक हे थंड हवेचे ठिकाण म्हणून रविवारी ओळखले गेले. कमाल तपमानात जवळपास ३ अंश सेल्सिअसने घट झाली. शनिवारी ३१ अंश सेल्सिअस असलेले कमाल तपमान रविवारी २८.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. तर, किमान तपमान १० अंश नोंदले गेले. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील तपमान सातत्याने घसरत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडी आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा हा परिणाम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.