नाशिक – शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर सतीश कुलकर्णी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एक्स रे रिपोर्टद्वारे हे स्पष्ट झाले आहे की त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूंचा फैलाव झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शहरात कोरोनाटी स्थिती सध्या आटोक्यात आहे. मात्र, आता महापौरांनाच कोरोना झाला आहे. दिवाळीच्या काळात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन महापौरांसह महापालिका प्रशासनाने केले होते. महापौर कुलकर्णी हे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्या प्रकृतीबद्दल विशेष काळजी घेतली जात आहे.