नाशिक – भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर व नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हसरूळ परिसरातील पाच हजार कुटुंबांना रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सनिक अल्बम-३० गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा
शुभारंभ रविवारी (३० ऑगस्ट) महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गीते, माजी महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, पुनम धनगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
रिलायन्स पेट्रोल पंप, दिंडोरी रोड येथे या गोळ्या वाटपास सुरुवात झाली. भाजपा शहर चिटणीस अमित घुगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी भाजपाचे सतीश वाविकर, विपुल सुराणा, अंजली अभंगराव, ऋषिकेश आहेर, भरत जुनागडे उपस्थित होते. तसेच गोळ्या वाटपासाठी अमोल जोशी, रोहन लाकुळे मयुरेश निकम, नितीन जाधव,देवेंद्र परदेशी, हर्षल गावित आदींसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.