नाशिक – महानगरपालिकेच्या वतीने गंगापूर धरणावर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. पूजेचे पौराहित्य मनोज देव यांनी केले. यावेळी उपस्थितांनी श्रीफळ अर्पण केले. या जलपूजन कार्यक्रमास सभागृह नेते सतीश सोनवणे, विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, गटनेते जगदीश पाटील, गजानन शेलार, विलास शिंदे, नगरसेवक अशोक मुर्तडक, चंद्रकांत खोडे, अधिक्षक अभियंता एस एम चव्हाणके, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, बि जी माळी, उपअभियंता गोकुळ पगारे, राजाराम भोये आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.