नाशिक – महापालिकेच्या आरोग्य विभागात होमिओपॅथी डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी नाशिक जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. महापालिकेच्या सेवेतील दवाखान्यात व रुग्णालयात होण्याची डॉक्टरांचा समावेश करून घ्यावा व महापालिकेच्या रुग्णालयात प्रत्येक विभागातील उपकेंद्र होमिओपॅथी दवाखाना दवाखाना होमिओपॅथी दवाखाना सुरु करून डॉक्टरांची नेमणूक करावी. त्यासाठी लागणाऱ्या औषधांच्या व्यवस्थेसाठी महापालिकेने आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ.भालचंद्र ठाकरे, स्वप्नील खैरनार, सारंग रहाळकर, ज्योती पाटील, धनंजय अहिरे, हेमंत आवारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .