महान भारतीय शास्त्रज्ञ : डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर
थोर शास्त्रज्ञ डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांची आज दि. १९ ऑक्टोबर रोजी जयंती त्या निमित्त विशेष लेख…
एका महान भारतीय शास्त्रज्ञाला सुमारे ३७ वर्षांपूर्वी एक जागतिक पातळीवरील अत्यंत मानाचा आणि मोठा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावेळी त्याचे सहकारी व वैज्ञानिक
मित्र त्याला सकाळच्या भेटण्यासाठी गेले असता तो शास्त्रज्ञ आपल्या घरी देवाची पूजाअर्चा करत बसला होता. त्यावेळी त्याचे मित्र म्हणाले की, अरे तुला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आणि तू देवपूजा करतो आहे. त्यावेळी तो शास्त्रज्ञ म्हणाला की, देव आहे की नाही हे कुणालाही सांगता नाही, परंतु देव नाही हे तुम्ही तरी सिद्ध करू शकता का? मी सुद्धा देव बघितलेला आहे परंतु मी एकाग्र होऊन ईश्वराचे चिंतन करतो तेव्हा मला आत्मिक आनंदाची अनुभूती मिळते, तुम्ही देवावर विश्वास ठेवा अगर नका किंवा तुमचा प्रश्न आहे, परंतु मला त्यात आनंद आणि समाधान मिळते. त्या आनंदापासून मला कोणी वंचित करू शकत नाही.कोण होते हे थोर शास्त्रज्ञ थोर शास्त्रज्ञ? ते होते नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर…
दरवर्षी नोबेल पुरस्कारांची घोषणा होते. सुमारे एकशे वीस वर्षांपासून हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. आतापर्यंत सुमारे 900 पेक्षा अधिक महान व्यक्तींचा वेगवेगळया क्षेत्रातील कार्याबद्दल आणि संशोधनाबद्दल या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यात हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच भारतीयांचा समावेश आहे . विशेष म्हणजे या भारतीयांपैकी दोघे एकाच परिवारातील काका-पुतणे होते. 1931 मध्ये थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांना रमन इफेक्ट बद्दल हा पुरस्कार मिळाला. आणि त्यानंतर सुमारे ५३ वर्षांनी म्हणजे इ.स. १९८३ मध्ये त्यांचे पुतणे डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदार्थ विज्ञान आणि खगोल शास्त्रातील संशोधनाबद्दल डॉ. चंद्रशेखर आणि डॉ. फाउलर यांना विभागून नोबल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. चंद्रशेखर हे मूळ दक्षिण भारतातील तामिळनाडूमधील रहिवासी होते . परंतु त्यांचा जन्म दि.19 ऑक्टोबर 1910 रोजी लाहोर येथे झाला. कारण त्यांचे वडील उत्तर पश्चिम रेल्वे विभागात ऑडिटर जनरल पदावर होते .नोकरीनिमित्त लाहोर येथे त्यांचे निवासस्थान होते. डॉ. चंद्रशेखर यांचा परिवार मोठा होता. त्यांना चार भाऊ व सहा बहिणी होत्या. डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर हे भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांच्या आई खूप हुशार होत्या, कारण त्यांनी इंग्रजी साहित्याचे त्या काळात त्यांनी भाषांतर केले होते. आपल्या सर्वच मुलांकडून आईच्या खूप अपेक्षा होत्या. लाहोरमध्ये त्यावेळी शिक्षणाची सोय होऊ शकले नाही म्हणून वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे शिक्षण घरीच झाले. एक खासगी शिक्षक यांना घरी शिकविण्यासाठी येत असत. तसेच आई-वडिलांचे देखील मार्गदर्शन असे .1918 मध्ये वडिलांची बदली मद्रास (म्हणजे आत्ताचे चेन्नई) येथे झाली. 1922 ते 1925 पर्यंत त्यांनी एका खासगी शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदार्थ विज्ञानातील बीएस्सी पदवी त्यांनी संपादन केली. 1930 मध्ये त्यांना केंब्रिजमध्ये शिकण्याची शासकीय स्कॉलरशिप मिळाली. 1933 मध्ये त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली
1936 मध्ये त्यांना शिकागो विद्यापीठात रिसर्चर (संशोधक) म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी निरंतरपणे विद्यापीठातील संशोधन विभागात मोठे कार्य केले. खगोलीय पदार्थविज्ञान हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. संशोधनासाठी त्यांना 1930 ते 1934 या काळात त्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली, केंब्रिज विद्यापीठात त्यांनी संशोधन पूर्ण केले.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)