मुंबई – अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू आणि कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत दिएगो मॅराडोना (वय ६०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी १९८६ मध्ये अर्जेंटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध चाचण्या केल्यानंतर हे स्पष्ट झाले की त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आहे. त्यानंतर मेंदूची शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचे निधन झाले. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या अति सेवनामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या ३० ऑक्टोबर रोजीच त्यांनी साठावा वाढदिवस साजरा केला होता.