मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. कोविड १९च्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक ताण पडू नये आणि सर्व नागरिकांना आरोग्य विषयक हमी आणि आर्थिक दिलासा मिळावा, हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. राज्यात कोविड १९ च्या रुग्णसंख्येत होणारी वाढ आणि रुग्णांना योजनेद्वारे मिळणारा लाभ लक्षात घेता ही मुदतवाढ दिली आहे.