गांधीच्या विचारांनी स्थापन झाली “महात्मा गांधी विद्यामंदिर”- डॉ. व्ही.एस. मोरे
पंचवटी – महात्मा गांधी विद्यामंदिर या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते, या संस्थेच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या ध्वजारोहना प्रसंगी डॉ. व्ही. एस. मोरे यांनी वरील विधान केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन करून कार्यक्रम सुरू झाला. डॉ. व्ही. एस. मोरे यांनी मार्गदर्शन पर मनोगतात सांगितले की, संस्थेच्या या उभारणीमध्ये कर्मवीर भाऊसाहेबांपासून पासून तर आजच्या पिढीपर्यंत हिरे कुटुंबाचे योगदान आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांवर अचल निष्ठा ठेवून कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी २ आक्टोंबर १९५२ रोजी “महात्मा गांधी विद्यामंदीर” संस्थेची मुहर्तमेढ रोवली.
कर्मवीरांच्याच पावलावर पाऊल ठेवत लोकनेते व्यंकटराव हिरे, पुष्पा हिरे, डॉ. प्रशांत हिरे, डॉ. अपूर्व हिरे, डॉ. अद्वय हिरे, संपदा हिरे यांनी संस्था नावारुपाला आणली. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्यांनी संस्थेचा हा वटवृक्ष मोठा करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला. अशा सर्व ज्ञात अज्ञांत सर्व घटकांचे मनापासून आभार मानले. आणि सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, द्वेष, मत्सर यांचा त्याग करावा व अहिंसा सत्य, समता, बंधुता या विचारांचा आपण सर्वांनी अंगीकार केला पाहिजे. असे त्यांनी यावेळी सांगितले नाशिक हा आदिवासीबहुल जिल्हा असून परंपरेने वंचित असलेल्या आदिवासींना अग्रक्रमाने शिक्षणाच्या माध्यामातून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महात्मा गांधी विद्यामंदीर या संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. हेच काम भविष्यात चालू ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. संस्था मोठी करण्यासाठी संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व घटकांनी त्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.साहेबराव पवार यांनी केले. तर आभार डॉ. संतोष पवार यांनी मानले.
या प्रसंगी आदिवासी सेवा समितीचे सचिव राजेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी जयेश पै,विश्वस्त डॉ प्रदीप.जी. एल. ,शाम भंडारी,सी. ए. पाटील , संस्थेतील मुख्य जनसंपर्क अधिकारी विद्या सुर्वे ,दिप्ती भुतडा, अर्चना पाटील, प्राचार्य डॉ दिगावकर प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, प्राचार्य डॉ गणेश तेलतुंबडे , तसेच विविध शाखेचे प्राचार्य, उपप्राचार्य, संस्थेतील पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोविड-19 साठी शासनाच्या नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.