मुंबई – महाड, जि. रायगड येथे तारिकगार्डन ही ५ मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना एकूण ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण १६ मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना/वारसांना ६४ लाख रुपयांचा इतका निधी मदत व पुनर्वसन विभागाने मंजूर केला आहे. हा निधी वितरीत करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांना देण्यात आला आहे. मदतीची रक्कम मयत व्यक्तीच्या वारसांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यात येणार आहे.