मुंबई – आर्थिक व्यवहारातील एखादी चूक किती महागात पडते याचा अनुभव सध्या सिटी बँक घेत आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी घोडचूक असल्याचे बोलले जात आहे. सिटी बँकेला तब्बल ३६५० कोटी रुपयांचा चुना लागल्याची बाब समोर आली आहे.
मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, सिटी बँकेने कॉस्मेटिक क्षेत्रातील रेवलॉन कंपनीकडे ५०० कोटी रुपये चुकून ट्रान्सफर झाले. बँकेच्या अधिकाऱ्यांच्या घोळामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. यात महत्त्वाची गोम म्हणजे, रेवलॉन ही कंपनी हे पैसे परत करण्यास तयार नसल्याने तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळेच हे प्रकरण थेट अमेरिकन कोर्टात गेले आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले आहे की, बँकिंग क्षेत्रातील ही सर्वाच मोठी घोडचूक आहे.
घोडतुकीचा हा प्रकार २०१६ मधील असल्याचे सांगितले जात आहे. सिटी बँकेने रेवलॉनला १.८ दशलक्ष डॉलरचे कर्ज दिले होते. बँकेच्या सॉफ्टवेअरमधील एरर मुळे रेवलॉनला ५०० दशलक्ष डॉलर एवढी रक्कम अधिक जमा झाली. सॉफ्टवेअर आणि बँक अधिकाऱ्यांमुळे हा प्रकार घडल्याचे बँकेचे म्हणणे आहे.
आता गेल्या ४ वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात आहे. परिणामी, या महाचुकीची शिक्षा बँकेला भोगावी लागत आहे. बँकेला ५०० दशलक्ष डॉलर म्हणजेच ३६५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय गेल्या ४ वर्षांपासून या रकमेवर कुठले व्याजही नाही. त्यामुळे बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून जगभरातील बँकिंग क्षेत्रात ही बाब चिंतेसह विशेषत्वाने चर्चिली जात आहे.