नाशिक – अंतराळ सप्ताहानिमित्त खगोल मंडळ यांचे तर्फे दररोज विषेशांक प्रसिद्ध करण्यात येत आहे. अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी विनामूल्य स्वरूपात वाचकांसाठी विषेशांक उपलब्ध करून देण्यात येत आहे. ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान दररोज हा ई – विषेशांक वाचकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
अंतराळ शास्त्राची खगोल माहिती मिळावी या उद्देशाने हा विषेशांक प्रसिद्ध करण्यात येत आहे. खगोल शास्त्राविषयी उपलब्ध असलेली, माहिती तसेच नव्याने होत असलेले संशोधन याविषयीचे लेख यात समाविष्ट करण्यात आले आहे. संपादिका सुजाता बाबर यांनी अंतराळ सप्ताहाची प्राथमिक माहिती, त्याविषयीचे पैलू यात उलगडले आहेत. उपग्रह संशोधन तसेच उपग्रहांचे कार्य याविषयी माहिती देण्यात आली आहे. ‘उपग्रहाचे मानवी जीवनाशी नाते’ याविषयी सई जोशी यांचा लेख प्रसिद्ध झाला असून, त्यात मानवाच्या दैनंदिन जीवनात उपग्रहाचे महत्व, त्याचा होणारा वापर आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त या विषेशांकात लेख पाठवण्यास इच्छुक असणाऱ्यांनी [email protected] येथे लेख पाठवावे असे आवाहन संपादिका सुजाता बाबर यांनी केले आहे.
I want this