तरनतारन (पंजाब) – येथील हरबंसपुरा गावात बहुतांश जण शेतीच्या व्यवसायात गुंतले असले, तरी ३४ वर्षीय दलजितसिंह यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण निर्माण केली आहे. या प्रदेशातील चिट्टी (पांढर्या) क्रांतीचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. शेतात पेंढा आणि डाळीची समस्या व त्यातून उद्भवलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी दलजितसिंग यांनी मशरूमची लागवड करण्यास सुरवात केली. या व्यवसायातून त्यांनी सहा महिन्यात १३ ते १४ लाख रुपये नफा मिळवला आहे.
सुमारे ७०० लोकसंख्या असलेल्या गावात राहणारा शेतकरी जगीरसिंग याला दोन मुले असून हरप्रीतसिंग आणि दलजितसिंग अशी त्यांची नावे. दलजितसिंग यांच्याकडे सात एकर जमीन आहे. १९९९मध्ये त्याची मशरूमची लागवड करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ एक शेड होते आता, २० शेडमध्ये ते मशरुमची शेती करत आहेत. प्रत्येक शेडची लांबी ७० फूट आणि रुंदी २० फूट आहे. मशरूमच्या लागवडीमुळे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
वर्षाकाठी १५० क्विंटल मशरूम होतात. २०० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये त्याचे वितरण होते. सहा महिन्यात जवळपास १३ ते १४ लाख रुपयांचा नफा दलजितसिंह यांनी कमवला आहे. त्यांच्याबरोबर काम करणारे आठ ते दहा कामगारांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. यासाठी दलजितसिंग यांना कृषी विभागानेही सन्मानित केले. सध्या इतर शेतकर्यांना मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण देत आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हा उपायुक्त प्रदीप सभरवाल यांच्या हस्ते दलजितसिंह यांना सन्मानित करण्यात आले.