सांगली – मराठी विश्वातील प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हे त्यांचे मुळगाव आहे. त्यांचा जन्मही येथेच १ मार्च १९६४ साली झाला. गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही हे ‘जखमा अशा सुगंधी’ आणि ‘महफिल-ए-इलाही’ या नावाने मराठी, उर्दू काव्यवाचनाचे कार्यक्रम करत. त्याचप्रमाणे ते मुशायरे व कविसंमेलनातही सहभाग घेत. आकाशवाणी व दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कवी होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू मासिकात इलाहीच्या कविता व गझल प्रसिध्द झाल्या आहे. नवोदित मराठी कवींसाठी ते गझल क्लिनिक कार्यशाळा घेत असे.