नाशिक – अमेरिकेत फिल्म आणि मीडियात मास्टर केल्यानंतर शुभम संजय शेवडे याने एका मराठी, पण दर्जेदार लघुपटाची डॉ. मोहन आगाशे आणि तनवी कुलकर्णी यांना घेऊन, वडील मुलगी या नात्या वर एका वेगळ्या शैलीत दी लास्ट मिनिट या लुघपटाची निर्मिती केली आहे. शुभमच नवीन तंत्रज्ञान,नवीन मांडणी नवीन कल्पना या मुळे डॉ. मोहन आगाशे अगदी भारावून गेले त्यांनी पण आपल्या दमदार अभिनयाने या लघुपटाला सर्वोच्च उंची दिली आहे तसेच झी मराठी च उत्कृष्ठ अभिनेत्रीचे पारितोषिक मिळवलेली तनवी कुलकर्णी हिने पण आपल्या दमदार अभिनयाची चुणूक या लघुपटात दाखवली आहे. या लघुपटाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच शुभमचे ध्येय आहे तसेच विविध देशात महाराष्ट्रसह भारताच नाव करण्याचा मानस आहे.
शुभमचे १० वी पर्यंतचे शिक्षण तिडके कॅालणीतील सेंट फ्रान्सीस हायस्कुल येथे झाले. त्यानंतर १२ वी पर्यंतचे शिक्षण त्याने आरवायके महाविद्यालयात घेतले. पुढे इंजिनिअरींगसाठी तो पुणे येथे गेला. वडील एचआर मॅनेजर म्हणून नाशिकला होते. ते सुध्दा नोकरीमुळे पुणे येथे गेले. त्यांचे सातपूर येथे घर आहे. असा नाशिक कनेक्ट असलेल्या शुभमने चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. शुभमने आता पर्यत विविध प्रकारचे देशात विदेशात ९० च्या वर लघुपटांची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची वेगळी शैली मांडणी या मुळे अमेरिका सह इतर देशात आणि भारतात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्याचप्रमाणे लवकरच एक हिंदी आणि एक मराठी पूर्ण चित्रपट निर्मितीचा त्याचा विचार आहे. त्याची मांडणी सुध्दा झाली आहे. एक ऍड फिल्म लवकरच सुरू करत आहे .त्याची पहिली हॉलिवूड फिचर फिल्म THE BIG RANT लवकरच प्रदर्शित च्या मार्गावर आहे.
दी लास्ट मिनिट या लुघपटाची टीम
दी लास्ट मिनिट लघुपटाचे छायांकन अमोल साळुंखेचे असून, कुणाल आहुजा आणि अजिंक्य गोखले ह्यांनी सहाय्यक दिग्दर्शकचे काम पाहिले. मयूर पवार यांनी कला दिग्दर्शन केले, तर अमोल भगत ,तृषाली ,कुस्तुब देशपांडे आणि वेदांत शेवडे यांनी इतर व्यवस्था बघितल्या आहे. वेदिका अविनाश नाईक या लहान मुलीने तनवीच्या लहानपणीची छोटी भूमिका केली आहे.