नाशिक – मराठी कवी लेखक संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश शेवाळे यांची केंद्रीय अध्यक्ष जेष्ठ लेखक दिनकर दाभाडे व कार्यकारणीने यांनी एकमताने केली. महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असलेल डॉ शेवाळे हे पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते संशोधक असून ते नियमित लेखन करीत असतात.
चांदवड येथील कवी व चित्रकार विष्णू थोरे यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर सचिवपदी कवयित्री प्रतिभा खैरनार, सहसचिवपदी सोमदत्त मुंजवाडकर, कोषाध्यक्ष प्रकाशक व लेखक प्रवीण जोंधळे, सहकोषाध्यक्ष डॉ. आशालता देवळीकर तर संघटक या पदावर कवी प्रशांत केंदळे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील मराठी कवी लेखक यांच्या अभिव्यक्ती तसेच न्यायहाक्कासाठी लढणाऱ्या हा अतिशय महत्वाच्या संघटनेच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
स्वागत!
छान उपक्रम!