पुणे – ऊर्जा खात्याच्या भरतीमध्ये एसईबीसी, अर्थात सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना वगळल्याच्या विरोधात सर्व जिल्ह्यात वीज महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एक डिसेंबरला आंदोलन केले जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाने तशी माहिती दिली आहे.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर येत्या आठ डिसेंबरला मोर्चा काढणार असल्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मराठा मोर्चाची पुण्यात बैठक झाली आहे. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने न्यायालयीन प्रक्रिया आणि इतर प्रत्येक बाबतीत वेळकाढूपणा केल्याने, मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे, या अस्वस्थतेतूनच हे आंदोलन केले जात असल्याचे, हे पदाधिकारी म्हणाले.