मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

समाजासाठी मी प्रत्येक लढाई लढण्यास तयार – छत्रपती खा. संभाजीराजे भोसले

by Gautam Sancheti
सप्टेंबर 27, 2020 | 9:36 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200926 WA0014

 

नाशिक – मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही मोहीमेवर मी समाजासोबत आहे. कुठलाही पहिला वार माझ्या छातीवर होऊ द्या, मी कुणालाही भिक घालणार नाही, अशा शब्दात छत्रपती खा.संभाजीराजे भोसले यांनी नाशिकमध्ये पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली.यावेळी ते म्हणाले की, समाजासाठी मी प्रत्येक लढाई लढण्यास तयार, आरक्षणाचा लढा हा समाजातल्या सर्वांचा लढा, प्रत्येकानं त्यात सहभागी होण्याची गरज असून राज्यातल्या खासदारांनी देखील यात सहभागी होण्याची गरज आहे. मला नेतृत्व नकोय, मी प्रामाणिक पणे लढतो, काम करतो.

मराठी आरक्षणाबाबत निर्माण झालेले समज गैरसमज, भरकटत जाणारे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन यावर मार्ग काढून मराठा आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करतांना छत्रपती खा.संभाजीराजे भोसले बोलत होते.यावेळी ते म्हणाले की, मी प्रत्येक मोहिमेत मराठा समाजासोबत आहे, पूर्ण बहुजन समाजाचा विचार करणं ही छत्रपती घराण्याची जबाबदारी, मी कधीही मॅनेज होणार नाही, मॅनेज झालो तर माझी लायकी छत्रपतींचा वंशज म्हणवून घ्यायची नाही. मात्र नेतृत्वाचा आग्रह करू नका, मात्र मराठा समाजाचा सेवक म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवा,

यावेळी त्यांनी सारथीला फक्त १३० कोटी दिले, त्यात काय होणार ? सारथीला एक हजार कोटी द्या, आरक्षणासोबतचं सारथीसाठीही लढा द्यावा लागेल, सारथीच्या अध्यक्षपदाबाबत मी विचार करू शकतो, पण मराठा समाजाचं नेतृत्व नको, प्रत्येक लढाईत मी सोबत, मोहीम कुठलीही द्या, मी खांद्याला खांदा लावून लढेल, घाबरण्याची गरज नाही, कोरोनालादेखील आपण हरवू, पण सर्वांनी एकत्र येऊ. मी तुम्हांला सरकार समोर घेऊन जातो, सर्व विद्वानांची टीम घेऊन जाऊ
सर्वांनी एकत्र येऊन एक लाईन ऑफ अॅक्शन ठरवा असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरात देखील समाजात दोन गट, मला वाईट वाटलं, सर्वांनी एकत्र येण्याची गरज. दोन्ही छत्रपती एकच, सातारा आणि कोल्हापूर हे छत्रपती एकच. काही नेते इकडे येतात, काही तिकडे. कशासाठी ही फालतूगिरी ? फालतूगिरी करणाऱ्या समाजातील नेत्यांना ठोका अठरा-पगड बाराबलुतेदार यांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य उभं केलं
वाईट वाटतेय समाजात काहींनी दुसरं दुकान उघडलंय. मराठा समाजातल्या सर्व घटकांनी एकाचं छताखाली येण्याची गरज. दुसरं दुकान का ? अशी खंतही खासदार संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीत झाले हे ठराव 

  •  इडब्लूएसमध्ये आरक्षण नको
    – प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत मराठा क्रांती मोर्चाने अधिकृतरित्या दिलेले निवेदन जिल्हाधिकारी (शासन) यांना द्यावे.
    – येत्या २ आॕक्टोबरला खासदार आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणे..
    – मराठा क्रांती मोर्चातील तरूणांवर दाखल असलेले सर्व गुन्हे सरकसकट मागे घेणे..
    – सन २०१९ मध्ये एमपीएससी मध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करणे
    -अतिवृष्टीमुळे फळबागेचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्याची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी १ लाख व इतर पिकांसाठी ६० हजार रूपये भरपाई द्यावी.
    – केंद्र सरकारने मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीवर क्रांती मोर्चा
    – येत्या पाच आॕक्टोबरला महाराष्ट्रातील प्रत्येक तहसिल ,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे.
    – सारथी संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी राजे यांची नियुक्ती करावी,सारथीला एक हजार कोटीचा निधी द्यावा..
    – राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठा समाजासाठी १२ टक्के वाढवून त्यासाठी आर्थिक        तरतूद करावी..
    – सर्व स्तरातून  येणाऱ्या निवेदनाचा मसूदा एकसारखा असावा..
    – प्रत्येक विषयासाठी अभ्यास तज्ञांची विषयानुरूप वेगवेगळी  समिती स्थापन करावी..
    – राज्य शासनाने राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे एसइबीसी प्रवर्ग १०२ घटनादुरूस्तीनुसार नोटीफाय करण्यासाठीचा         प्रस्ताव पाठवावा..
    – राज्यशासनाने केंद्रशासनाला राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करून पन्नास टक्क्यांची मर्यादा रद्द/ संपविण्यासाठी                 करण्यासाठी   विनंती प्रस्ताव पाठवावा.”
    – राज्य सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत  वाढीव जागांची तरतूद(सुपर न्युमररी) करून  आर्थिक तरतूद करावी
    –  सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणाऱ्या  जेष्ठ वकीलांना ब्रिफींग करण्यासाठी सुचवलेल्या वकीलांची समिती तात्काळ गठीत करण्यात यावी.
  • आरक्षणाचा प्रश्न घटना दुरूस्तीमुळे सुटणार असल्याने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी दिल्लीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजीत केला पाहीजे.
    – ज्या योजनांबाबत सरकारने घोषणा केल्या आहेत.त्यांची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहीजे..
    – आठ ते दहा लोकांची समिती नियुक्त करून  त्या समितीलाच शासन प्रशासनाशी चर्चा करण्याचे अधिकार द्यावेत..
    – मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत,आंदोलनाबाबत माध्यमांना माहीती देण्यासाठी अधिकृत अभ्यासू प्रवक्ते नियुक्त करावेत..त्यांनीच माध्यमांशी संवाद करावा.
    – मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी.
    – भविष्यातील कुठलेही आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे.मराठा क्रांती मोर्चाची परंपरा कायम राखावी..
    – कुठल्याही मागास वर्ग समाजाच्या विरोधात क्रांती मोर्चा जाणार नाही..
    – आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयीन लढ्यात सरकारची पर्यायाने समाजाची बाजू मांडण्यास अपयशी ठरलेले महाअधिवक्ता कुंभकोणी यांचे अधिकार काढून घ्यावेत..
    – महाराष्ट्रात १० आॕक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाशी महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध  नाही

बैठकीला प्रमुख नेते उपस्थितीत

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीला खासदार संभाजीराव भोसले, अण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, आ. दिलीप बनकर यांच्यासह मराठा समाजाचे प्रमुख नेते उपस्थितीत आहे. श्रीमंत यशराजे  भोसले, माजी आमदार नितीन भोसले, सुनील बागुल,अँड शिवाजी सहाने, नाना महाले, अद्वैय हिरे, अर्जुन टिळे, अमृता पवार, वत्सला खैरे, शिवाजी चुंबळे, माधवी पाटील, करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप, तुषार गवळी, योगेश कापसे, किशोर चव्हाण ,आदीसह  कायदेतज्ञ तसेच राज्यभरतील समन्वयक उपस्थित होते.

सरकारी घोषणा पत्रकांची केली होळी

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशकात सुरुय या हिंदी चित्रपटाचे शुटींग

Next Post

भाजपा, मनसे मधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्या उद्घाटन…केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, मंत्री भुजबळ, महाजन यांची विशेष उपस्थिती

सप्टेंबर 9, 2025
NMC Nashik 1
स्थानिक बातम्या

नाशिक महानगरपालिकेत प्रभाग रचनेवरील ९१ हरकतीवर सुनावणी संपन्न…

सप्टेंबर 9, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
संमिश्र वार्ता

नेपाळसारखी दुर्घटना कोणत्याही देशात घडू शकते! सावध राहा!…संजय राऊत यांचे ट्विट

सप्टेंबर 9, 2025
bhujbal 11
संमिश्र वार्ता

छगन भुजबळांची नाराजी कायम…मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले हे पत्र

सप्टेंबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

घर गहाण प्रकरणात दहा लाखाला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 9, 2025
Next Post
833b23b0 f3cf 4635 91f7 9da4c198a9ec

भाजपा, मनसे मधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011