नवी दिल्ली – मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजपासून नियमित सुनावणी होणार होती. मात्र, आजची सुनावणी स्थगित झाली असून ती आता ५ फेब्रुवारीला होणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठविण्यास नकार दिला होता. त्यामुळे ही बाब राज्य सरकारला चपराक देणारी होती. याप्रकरणी राज्य सरकारने पुन्हा विनंती केली. त्यानुसार २५ जानेवारीपासून सुनावणी सुरू होणार होती. प्रत्यक्षात त्याच्या पाच दिवस आधीच न्यायालयाने सुनावणी सुरू करण्याचे संकेत दिले. मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. सरकारी वकीलांची यासंदर्भात बैठकही झाली होती. मात्र, आता ही सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार आहे.