नाशिक – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी छत्रपती संभाजी राजे भोसले यांना पत्र लिहिले आहे. आपण समाजाचे नेतृत्व करावे असे आवाहन गोडसे यांनी राज्यसभेचे खासदार असलेल्या छत्रपती संभाजी राजे भोसले यांना केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी व राज्यभर मराठा समाजाने मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून केलेल्या मागणीनंतर समाजाला आरक्षण मिळाले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणास दिलेली स्थगिती उठविण्यासाठी व पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी गोडसे यांनी हे पत्र लिहिले आहे. पुढील दिशा ठरवण्यासाठी संभाजीराजेंना नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर बैठक करण्यात यावी अशी विनंती देखील गोडसे यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.
खास मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मिडियाने पुढाकारघ्यावा