रविवार, ऑगस्ट 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मराठा आंदोलकांना नोटिस; पोलिस आयुक्तांसमवेत बैठक

by Gautam Sancheti
सप्टेंबर 14, 2020 | 11:36 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक – नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्ता समन्वयकांना शहर पोलिसांकडून नाहक त्रास देण्याच्या हेतूने कलम १४९ अन्वये नोटीस बजावली जाणार नाही. तथापी संभाव्य आंदोलनात  सार्वजनिक शांतता भंग होऊन सामान्य जनजीवन प्रभावीत होणार नाही याची खबरदारी क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे.
नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या प्रातिनिधीक बैठकीत झालेल्या ठरावानंतर शहराची कायदा सुव्यवस्था ढासळेल असे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाकडून होऊ नये यासाठी शहर पोलीस सजग झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही समन्वयकांना शहर पोलीसांनी कलम १४९ अन्वये इशारा वजा नोटीस दिली होती. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आणि मराठा क्रांती मोर्चा स्वयंसेवक यांची बैठक पोलिस आयुक्तालयात झाली.
मराठा क्रांती मोर्चाचे राजू देसले, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, आशिष अहिरे आदी बैठकीला उपस्थित होते. आंदोलनाच्या परांपरेला धक्का लागणारी कुठलीही भुमिका जबाबदार समन्वयक म्हणून आम्ही घेणार नाही. उलट कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घेऊ, असे समन्वयकांनी सांगितले. आयुक्तांनी यावर समाधान व्यक्त केले. आकस किंवा पुर्वग्रहाने पोलिस कारवाई करणार नाहीत, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. बैठकीला उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे हे सुद्धा उपस्थित होते.
——
मराठा समाज समंजस आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे. कायदा सुव्यवस्था ढासळेल असे कृत्य स्वतःहून कुठल्याही आंदोलनात होणार नाही.
– राजू देसले
—-
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये जी आंदोलने पुकारली जातील, तीच आंदोलने समाजाच्या वतीने व्हावीत. कोणीही वैयक्तिक आंदोलन करू नयेत, ही नम्र विनंती. समाज एकसंघ आहे आणि तो एक संघच ठेवावा.
– करण गायकर
……….
मराठा समाजाविषयी पुर्वग्रह बाळगून या आंदोलनाच्या भावना भडकावण्यासाठी काही विध्वंसक प्रवृत्ती सोशल मिडीयावर अॕक्टीव्ह आहेत. त्या प्रवृत्तींनाही पोलीस यंत्रणेने समज द्यावी.
– तुषार जगताप
—
छत्रपतींनी आम्हाला वैधानिक संघर्ष शिकवला आहे. त्याच मार्गावर आम्ही लोकशाही पध्दतीने आमचे हक्क पदरात पाडून घेऊच. फक्त आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, हिच विनंती आहे.
– गणेश कदम
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑक्सिजन टँकर व सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

Next Post

दिव्यांगांसाठी राज्यात ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Min Dhananjay Munde

दिव्यांगांसाठी राज्यात ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Jitendra Awhad

ये अंदर की बात है, नितीन गडकरी ‘सत्य’ के साथ है!…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

ऑगस्ट 10, 2025
Untitled 12

राष्ट्रवादी शरद पवार गटाची राज्यव्यापी ‘मंडल यात्रा’….३५८ तालुक्यात १४ हजार ८७७ कि.मी. प्रवास करणार

ऑगस्ट 10, 2025
Gx5vSZ XUAAfR4y e1754792266102

या गावातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या रक्ताने लिहले पत्र…केली ही मागणी

ऑगस्ट 10, 2025
congress 11

पुण्यात काँग्रेसच्या निवनियुक्त प्रदेश पदाधिका-यांची दोन दिवसांची निवासी कार्यशाळा….काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या ऑनलाईन करणार संबोधन

ऑगस्ट 10, 2025
Untitled 11

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पहिल्या मालगाडीचे आगमन….पंतप्रधानांनी केले कौतुक

ऑगस्ट 10, 2025
Rawal 1 1 1024x768 1 e1754790679186

दिल्लीत केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक…शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांवर झाली चर्चा

ऑगस्ट 10, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011