कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. आता त्यांचे भाऊ कार्तिक बॅनर्जी हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते म्हणाले की, मला राज्यातील साम्राज्यवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली असून ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज खरा ठरु लागला आहे.
कार्तिक बॅनर्जी म्हणाले की, मला हुकूमशाहीचे राजकारण संपवायचे आहे. त्यापुर्वी काही दिवसांपूर्वी भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, लवकरच हरीश मुखर्जी रोड म्हणजे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निवासस्थान येथेही कमळ फुलविले जाईल. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉंग्रेसमध्ये वाद सुरूच आहे. आतापर्यंत अनेक नेते तृणमूल सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर इकडे तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आपला पुतण्या अभिषेक बॅनर्जीला पुढे करत घराणेशाही आणि वंशवादी राजकारणाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजप करीत आहे.
दरम्यान, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ आयोजित कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांचे बंधू कार्तिक बॅनर्जी यांनी बंडखोरीची भाषा करीत सांगितले की, मला बंगालमधील द्वेषाचे राजकारण संपवायचे आहे. लोकांच्या जीवनात सुधारणा करण्याच्या असून सध्या स्वत: च्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन सुधारण्याविषयी बोलणार्या राजकारण्यांनी तो वैतागला आहे. कार्तिक बॅनर्जी यांच्या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली आहे आणि त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.