कोलकाता ः बेकायदेशीररित्या कोळसा उत्खनन आणि तस्करी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा खासदार पुतण्या आणि तृणमूल काँग्रेस युवक अध्यक्ष अभिषेक बॅनर्जी तसेच त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.
कालीघाट विभागात असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्या शांतिनिकेतन या निवासस्थानी सीबीआयचं पथक रविवारी पोहोचलं. आधी अभिषेक यांना नोटीस पाठवल्याची बातमी आली. पण नंतर सांगण्यात आलं की, ती नोटीस त्यांची पत्नी रुजिरा यांच्या नावानं आली आहे.









