नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संयुक्त जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे साजरी करण्यात आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिपचंद्रजी पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार व ज्येष्ठ नगरसेवक सलिम (मामा) शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी गंगापूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय येथे त्यांच्या फलकचित्रावर पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी नामदेवराव पाटील, मनोज घोडके, सत्यम खंडाळे, नितीन साळवे, रामदास दातीर, संतोष कोरडे, विजय आहिरे, अक्षय खांडरे, अविनाश पाटील, राकेश परदेशी, अमित गांगुर्डे, अर्जुन वेताळ, नितीन माळी, खंडू बोडके, धीरज भोसले, सुजाताताई डेरे, नगरसेविका नंदिनीताई बोडके व वैशालीताई भोसले, पद्मिनिताई वारे, अरुणाताई पाटील, भानुमती आहिरे, ज्योतीताई शिंदे, मुक्ताताई इंगळे, उज्ज्वला थुल, शैलाताई शिरसाठ, निर्मलाताई पवार, नवनाथ जाधव, गणेश मंडलिक, कौशल पाटील, किशोर वडजे, ललित वाघ, अभिजित गोसावी, अजिंक्य बोडके, निलेश सहाणे, सौरभ सोनवणे, अमोल भालेराव, गणेश शेजुळ, सुयश मंत्री, शुभम थोरात, चारुदत्त भिंगारकर, विकी कांबळे, ऋषिकेश शिरोडे, नीरज जगधने आदि पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.