नाशिक : केंद्र सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणास अनुसरून औद्योगिक क्षेत्रातील कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता असून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगार-कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मांडाव्यात असे आवाहन नाशिक दौऱ्यावर येत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांनी केले आहे..त्यांचा दोन दिवसाचा दौरा असून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट व नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील नामवंतांना भेटून त्यांच्या समस्या ते ७ व ८ ऑक्टोबर अशा दोन दिवसात जाणून घेणार आहे. औद्योगिक, व्यापारी व सेवा क्षेत्रांतील कामगार-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मांडाव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.