मुंबई – वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने राज्यभर आक्रमकपणे आंदोलन केले. मुंबई, ठाणे, नाशिक, अौरंगाबाद सह राज्यात ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. अौरंगाबाद येथे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. मुंबई येथे मनसेचे नेते राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांमार्फत जिल्हाधिका-यांना पत्र दिले असून त्यात वीजबिल भरु नका असे जनतेला आवाहन केले आहे.