नाशिक : आगामी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी २७ अॅाक्टोंबर पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष मा. अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग बैठका सुरु झाल्या आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा विभागातील प्रभागांच्या दौऱ्यांच्या नियोजनाकरीता गुरुवारी पश्चिम नाशिक विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल शिवार येथे संपन्न झाली.
अत्यंत सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या बैठकीत प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी पश्चिम नाशिक विभागातील प्रभागांच्या दौऱ्यांच्या नियोजन तसेच संघटना बांधणी व आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारींविषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, विभाग अध्यक्ष रामदास तात्या दातीर, पश्चिम विधानसभा निरीक्षक विजय रणाते, नितीन माळी, सागर कोठावदे, अक्षय खांडरे, अर्जुन वेताळ, महिला सेना जिल्हाध्यक्षा पद्मिनिताई वारे, शहराध्यक्षा अरुणाताई पाटील, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर व गणेश मोरे, जिल्हाध्यक्ष अरुण दातीर, शहराध्यक्ष संदेश जगताप, ललित वाघ, सौरभ सोनवणे, अजिंक्य बोडके, अक्षय कोंबडे, गोपी पगार, प्रसाद जाधव, संजय दातीर, प्रवीण दातीर, पंकज बच्छाव, अमोल भांबर, उज्वला थूल, निर्मला पवार, नंदा कातोरे, शैला शिरसाठ आदि पदाधिकारी तसेच महिला सेना, विद्यार्थी सेना व सर्व अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.