नाशिक : आगामी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग बैठका सुरु झाल्या आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा विभागातील प्रभागांच्या दौऱ्यांच्या नियोजनाकरीता रविवारी सातपूर विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक रामजी हॉल येथे संपन्न झाली.
या बैठकीत विभागातील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पश्चिम नाशिक सातपूर विभागातील प्रभागांच्या दौऱ्यांचे नियोजन, संघटना बांधणी व आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारींविषयी याबैठकीत प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार, मनसेचे नगरसेवक सलीम (मामा) शेख, नगरसेवक योगेश भाऊ शेवरे, उपशहराध्यक्ष विजय आहिरे व सचिन सिन्हा, शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे, विभाग अध्यक्ष प्रकाश दादा निगळ, सुरेश (नाना) भंदुरे, अंबादास आहिरे, पद्मिनीताई वारे, अरुणाताई पाटील, निर्मला पवार, आरती खिराडकर, अनिता ठोक, उज्वला थुल, सुरेश खांडबहाले, किशोर वडजे, तुषार भंदुरे, विशाल आव्हाड, गणेश जायभावे, सागर निगळ, तेजस वाघ, विशाल भावले, वैभव रौंदळ, गौरव भामरे, तसेच महिला सेना, विध्यार्थी सेना व सर्व अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.