नाशिक : आगामी ग्राम पंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पक्षीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मुख्य संघटनेतील सर्व पदाधिकारी व अंगीकृत संघटना पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आज सोमवारी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे भरवण्यात आली होती. या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
अत्यंत सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या बैठकीत प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तू दातीर, उपजिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष खंडूभाऊ मेढे व संदिप भवर यांनी संघटना बांधणी व आगामी ग्राम पंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारींविषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मनोज ढिकले, सुरेश घुगे, मनोज घोडके, रमेश खांडबहाले, संदीप किर्वे, अजय दुबे, कांतीकाका चौबे, मुकेश परदेशी, राहुल नवले, शैलेश येलमामे, नितीन थोरे, पद्मिनीताई वारे, सर्व तालुकाध्यक्ष, नाशिक जिल्हातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, तसेच महिला सेना, विध्यार्थी सेना व सर्व अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.