नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर व शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांच्या आगामी ग्राम पंचायत निवडणुकांच्या नियोजनासाठी सर्व ग्रामीण पदाधिकारी व ग्राम पंचायत निवडणुकांसाठी पक्षाने दिलेल्या निरीक्षकांची एकत्रित बैठक पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे संपन्न झाली.
या वेळी प्रदेश उपाध्यक्ष इचम, जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी, सर्व उपजिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा कामिनिताई दोंदे व महिला सेना पदाधिकारी, कामगार सेना उपचिटणीस प्रकाश (बंटी) कोरडे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील व अरुण दातीर व मनविसे पदाधिकारी, निरीक्षक यांनी आगामी ग्राम पंचायत निवडणुकांसाठी पक्षाचे धोरण, मतदार यादी निरीक्षण, गट, गण आरक्षण, उमेदवारांच्या मुलाखती, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांचे अहवाल, कार्यकर्त्यांशी चर्चा, एकूण वॉर्ड, वॉर्ड रचना, वॉर्ड नकाशा, लोकसंख्या, पक्षीय बलाबल, विजयी व पराभूत उमेदवारांची यादी, अपक्ष उमेदवार, मतदानाची टक्केवारी आदि मुद्द्यांवर आपली मते मंडळी.या प्रसंगी पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, निरीक्षक व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.