नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी शाम प्रकाश गोहाड तर शहराध्यक्षपदी संदेश संजीवकुमार जगताप आणि ललित नरेश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष राज ठाकरे तसेच मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली आहे. या निवडीनिमित्त त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


