मनमाड – तब्बल ४२ वर्षांनंतर त्यांच्या शालेय आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते १९७८ च्या छत्रे हायस्कूलच्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदरचे. हाॕटेल श्रीलीला येथे झालेल्या गेट टुगेदर कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेस अभिमान असून भविष्यात असेच कर्तृत्व गाजवावे आसा आशावाद व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास जे.डी.कुलकर्णीसर,सुभाष गुजराथीसर व सौ. चित्रा गुजराथी , एन. एस. पाटीलसर उपस्थित होते.
कवी प्रदीप गुजराथी यांनी प्रास्तविक व सर्वांचे स्वागत केले.सुंदर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समुह प्रमुख गिरीश सालकाडे व बबन कराड यांनी उपस्थित शिक्षकांचा शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ व स्नेहभेट देऊन यथोचित सत्कार केला. सौ. सुजाता कुलकर्णी व सौ. ज्योती कारंजे यांनी सूत्रसंचालन केले.
उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी – विद्यार्थींनींनी स्वपरिचय सांगून दहावीनंतरच्या प्रवासाचा आढावा घेतला.
स्नेहभोजनानंतर झालेल्या दुपारच्या सत्रात कविता, गाणे, विनोद, गप्पागोष्टी असा मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम झाला.नंतर सर्व विद्यार्थ्यांनी छत्रे हायस्कुलला भेट दिली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात आपल्या बेंचवर बसून आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी सौ. सुजाता कुलकर्णी यांनी शाळेस व मनमाड सार्वजनिक वाचनालयास वडिलांच्या स्मरणार्थ भेट दिली.
कार्यक्रमास गिरीश सालकाडे , सौ.सुजाता कुलकर्णी , बबन कराड, विलास बिडवे, भरत परदेशी, प्रदीप शिंदे, प्रदीप गुजराथी , दिलीप सुरडे,सुरेश बंन्सवाल, किशोर चोथमल,सौ. ज्योती कारंजे , धनंजय जाधव, अशोक चोथमल , सौ.नीता कुलकर्णी , सौ. नलिनी कुलकर्णी , प्रफुल्ल बोगावत, कैलास बेदमुथा , सुनील गुजराथी , सौ. कामिनी चौधरी , जिया मंन्सुरी, वाल्मिक गोरे व रोहिणी चंदनशिव आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.