– थकबाकीमुक्त शेतकरी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार
– कोकण प्रादेशिक संचालकांच्या हस्ते सन्मानित
नाशिक – महावितरणतर्फे महाकृषी ऊर्जा अभियान राबविण्यात येत असून या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना थकबाकीमु्क्त होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कल्याण परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी मनमाड विभागातील थकबाकीचा भरणा करून अनेक वर्षाच्या कृषीपंप थकबाकीतुन मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रादेशिक संचालकांच्या हस्ते थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन मंगळवारी महावितरणच्या मनमाड विभागीय कार्यालयात सन्मानित करण्यात आले. मनमाड विभागातील वीज देयक थकबाकी वसुली व कृषी पंप वीज धोरण २०२० यासंदर्भात विविध कार्याचा आढावा मनमाड विभागीय कार्यालयात मंगळवारी प्रादेशिक संचालकांनी घेतला, यावेळी सदर शेतक-यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मालेगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता रमेश सानप, मनमाड विभागाचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, यांचेसह मनमाड ,नांदगाव ,येवला शहर व ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते. मनमाड उपविभागातील कृषी पंप ग्राहकांनी कृषी पंप वीज धोरण २०२० अंतर्गत कृषीपंपाचे सूट मिळवून देय रक्कमेचा भरणा करून वीज देयक थकबाकी मुक्तीबद्दल सहव्यवस्थापकीय यांचे हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये खालील शेतक-यांचा समावेश होता.
राजाराम गोविंद डगळे – (१४,९४०), रतन कारभारी पाटील – (६,३००), बाजीराव त्र्यंबक डगळे -(१८,८८०), देविदास त्र्यंबक डगळे – (१४,६७०), गोविंद विठ्ठल पाटील (१८,९००), जगन्नाथ गमन खेमाणार रां. कानडगाव (१६५१०) आणि पुंडलिक गमन खेमनार रा. धोटाणें (१७,६३०) याप्रमाणे रक्कम भरून योजनेत भाग घेऊन आपली थकबाकी शुन्य केली
नांदगाव तालुक्यातील एकूण ७८३ ग्राहकांनी एकूण रु.१ कोटी ७४ लाख व येवला तालुक्यातील एकूण ९,१२ ग्राहकांनी एकूण रु.१ कोटी ९५ लाख असे एकूण मनमाड विभागअंतर्गत १,६९५ ग्राहक यांनी रु.३ कोटी ६९लाख कृषीपंपाचे माहे सप्टेंबर २०२० अखेर पर्यतचे संपूर्ण देय रक्कमेचा भरणा करून आपली थकबाकी शुन्य केली असता एकूण १,३२७ ग्राहकांना यामध्ये नांदगाव तालुका ६३७ व येवला तालुका ६९० कृषी ग्राहक यांना उपविभागीय कार्यालयाद्वारे सन्मानपत्र प्रदान करण्यात आलेले आहे. .
यासोबतच व्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी यांना सर्व वर्गवारीच्या वीज ग्राहकांची थकीत रक्कम वसूल करावी व नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणेबाबत निर्देशित केले. व ग्राहकांनी सुद्धा आपली देयकाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.