मनमाड – परिसरातील पानेवाडी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीची संरक्षण भिंतीचे एका इंधन भरलेल्या टॅंकरने जबर धडक दिल्याने नुकसान झाले आहे. तरीही हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या टँकर चालकावर कुठलीही कारवाई न केल्यामुळे स्थानिक नागरिकांसह अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. या घटनेत कारवाई करण्याची गरज होती. मात्र कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीची पानेवाडी गावात जाणाऱ्या रस्त्याला या क्षेत्रातील संरक्षण भिंत असून त्याला लागूनच रस्ता आहे. एका कंपनीचा इंधन भरलेला टँकर गावात इंधन चोरी करण्यासाठी गेला असल्याचे बोलले जाते. त्याच रस्त्याने एक दुसरे वाहन आल्यामुळे त्या टॅंकरने भीतीला जबर धडक दिली. या धडकीत संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला.याची माहिती मिळताच हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तेथे दाखल झाले. त्याच ठिकाणी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे ही आहे.मात्र भींत कशी पडली हे समजूनही ही सदर अधिकाऱ्यांनी त्या टैंकर चालकावर कुठलीही कारवाई केली नाही. दुसऱ्या कुठल्या एखाद्या वाहनाने ही भींत पाडली असती तर त्या विरोधात कंपनीने कारवाई केली असती. परंतु टैंकर चालकांच्या हलगर्जीपणामुळे भिंतीचा भाग कोणी आणि कशी धडक देऊन कोसळली हे समजून ही या प्रशासनाने कारवाई का ? केली नाही असा संतप्त सवाल येथील परिसरातील नागरिकांसह इतर वाहनधारकांनी व्यक्त केला आहे.दरम्यान या कंपनीची संरक्षण भिंत आधीच कोसळली असून तिचे काम अर्धवट आहे. त्यातच आज एक इंडियन ऑइल कंपनीचा भरलेला टँकर पानेवाडी गावात इंधन चोरी करण्यासाठी गेला असताना घाईगर्दीत समोरून एक वाहन आल्यामुळे त्याने या संरक्षण भिंतीला धडक दिल्याने तीचे नुकसान झाल्याने गाव परिसरात चर्चा आहे. तर हे सर्व दृश्य सीसीटीव्ही मध्ये दिसूनही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही याबाबत तर्क,वितर्क काढले जात आहे. याबाबत कंपनीच्या अधिका-यांनी माहिती देण्यास नकार दिला.