मनमाड – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या बलात्कार व हत्त्या घटनेच्या विरोधात बुधवारी दलित संघटनानी मनमाड बंदची हाक दिली होती. त्याला शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देवून कडकडीत बंद पाळला. या बंदला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीय, वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षांनी पाठिंबा दिला होता. संतप्त कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करून तीव्र निदर्शने करत घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.