नाशिक – कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे पहिले सहा मशीन मनमाडकरच्या सेवेमध्ये दाखल झाले होते. आज परत दहा मशीनचे वाटप स्वर्गीय विनोद भाऊ मोतीलालजी ललवाणी चॅरिटेबल ट्रस्ट कडून करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधीक्षक समीर सिंग साळवी, मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मुंडे , प्रभारी पोलीस निरीक्षक गीते, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी या मान्यवरांनी ही सेवा आजच्या काळात फार गरजेची आहे. तसेच या कार्यामुळे मनमाड मधील जनतेस अशा कठीण प्रसंगी चांगलीच मदत होईल असे मत व्यक्त केले. या प्रसंगी राजेंद्र चोरडिया यांनी एक मशीन भेट दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार आझाद आव्हाड यांनी केले. या कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आनंद ललवाणी,महावीर ललवाणी यांनी केले.
याप्रसंगी मुकेश ललवाणी, बलविंदरसिंग कांत, रोशन हिरण, प्रफुल्ल भंडारी,सागर सिनकर, प्रदीप सोनवणे, देवेंद्र मुळे, राकेश ललवाणी , उमेश ललवाणी, सुशांत पगारे, कुणाल गायकवाड, प्रवीण जाधव , उमेश गांधी , पंकज बरडिया ,सुनिल लुणावत आदी उपस्थित होते.
ऑक्सिजन मशीनसाठी येथे संपर्क करावा
प्रफुल्ल भंडारी, साई मेडिकल मालेगाव नाका
9762626205