मनमाड – कोव्हिडकाळात निराधार,निराश्रित,गरीब, बेरोजगार, स्नानबध्द झालेले प्रवासी, आणि कोविड रुग्ण इत्यादींना सेवा देणाऱ्यांमध्ये ख-या अर्थाने देव दिसला म्हणून त्यांचा सत्कार करणे म्हणजे परमेश्वराची स्तुती करण्यासारखेच आहे ,असे गौरोदगार सेंट झेवियर हायस्कूलचे मुख्याध्यापक रेव्ह.फादर सॕबी कोरीया यांनी काढले.
सेंट झेवियर शाळेच्या मुलांच्या वसतीगृहात आयोजित कोविड योध्दयांच्या कृतज्ञतापर सत्कार सोहळ्यात आयोजक म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर मनमाड गुरुद्वारा प्रबंधक आदरणीय बाबा रणजितसिंग, कोविडसेंटरचे नोडल अधिकारी डाॕ. रवि मोरे, करुणा हाॕस्पिटलच्या सिस्टर मारिया, सिस्टर लिझी, मनमाड पो.स्टेशनचे सहा.निरिक्षक तायडेसाहेब, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बब्बू शेख, खजिनदार अमिन शेख, निराला स्टोअर्सचे गुरुदिपसिंग कांत,
नगरपालिकेतील मुख्य अभियंता अज्जूभाई, पाटीलसाहेब, रेव्ह.फादर लाॕईड, ब्रदर वेन्सील आदी मान्यवर उपस्थित होते. सेंट झेवियर मिशन तर्फे आयोजित या कृतज्ञतापर सत्कार सोहळ्यात कोविडकाळात अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी,शासकीय डाक्टर ,त्यांचे सहकारी आरोग्य विभागातील कर्मचारी, नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी, रुग्णवाहीकेचे चालक, सफाई कर्मचारी आदीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक फा. सॕबी यांनी केला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अनिल निकाळेसर यांनी केले महेश भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.