मनमाड – येथील जुने रहिवाशी प्रसिद्ध असलेले शेवडे टेलर्स यांची नात केतकी कुलकर्णी हिने टीव्ही सिरीयल क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. केतकीने वयाचा दहाव्या वर्षापासून टीव्ही सिरीयल मध्ये काम करण्यास सुरुवात केली.
आतापर्यंत तीने अस्मिता, शौर्य, लक्ष अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. त्याचप्रमाणे डीडी नॅशनल हिंदी वर सावित्रीबाई फुले यांच्या लहानपणाची भूमिका तीने केली आहे. आता ती सगळ्यांचा माहितीतील असलेली सोनी मराठी वरील “हम बने तूम बने” या मालिकेत आगळी वेगळी शर्मीली म्हणून गेले दोन वर्ष करत आहे. गणेशोत्सवात झालेल्या बिग बजेट प्रॉडक्शन ची “जय देवा श्री गणेशा” मध्ये देवी रिद्धीची भूमिका बजावली, तसेच राधा कृष्णा मध्ये उत्तरा म्हणून छोटी भूमिका केली. तिला नृत्याची प्रचंड आवड आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याकडून सुध्दा तीला पारितोषिक मिळाले आहे. तीने डान्स विथ माधुरी on टाटा स्कायची छोटी जाहिरात सुध्दा केली आहे. केलकीला नाशिक व मनमाडची अत्यंत ओढ आहे.
सध्या दहावीत असल्याने अभ्यास पण चालू आहे. तीचे हे वर्षे संपले की ती पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करणार आहे.