मनमाड – शहरातील जेष्ठ आणि कट्टर शिवसैनिक अजय (थापा) रत्नाकर जाधव यांचे रविवारी रात्री हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांची सोमवारी राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, मित्र परिवार उपस्थित होते. नाशिक मनपाचे भाजपा नगरसेवक व मजूर फेडरेशनचे पदाधिकारी बंटी हिरे,माजी आमदार राजेंद्र देशमुख, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यांची भाषणे होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. मनमाडला शिवसेनेच्या स्थापनेपासून ते कार्यरत होते.