मनमाड – कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा शहरात झाला आहे. मनमाडचे माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे यांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून त्यांना याबाबत माहिती दिली. राज्यातही असा तुटवडा सर्व ठिकाणी जाणवू लागला. त्यामुळे या इंजेक्शन बाबत प्रशासनाने माहिती द्यावी, हे इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे असेही सोळसे यांनी सांगितले. त्यांनी त्यासाठी एक पत्रही तयार केले असून ते प्रमुख लोकांना पाठवले आहे.