मनमाड – कोरोनाची महामारी , मंदी, पहील्या टाळेबंदीतुन सावरत नाही तोच दुसरा लॉकडाउन जाहीर झाला. लॉकडाउनच्या काळात व्यापारींना कोणत्याही प्रकारची सवलत किंवा शासकीय पॅकेज मिळालेले नाही. आणि अशामध्येच दूसरे लॉकडाउनची घोषणा यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे व्यापारी हा धस्तावलेला आहे. व्यापारी हा उदध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी शासनाने व्यापाऱ्यांना आपल्या रोजीरोटीसाठी सर्व दुकाने चालू करू द्यावी. व्यापारी सर्व प्रकारच्या नियम व शर्ती चा पालन करून आपल्या व्यापार करतील. शासनाने सर्व व्यापारी वर्गास आपल्या उदरनिर्वाहासाठी दुकान चालु करण्याची परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक यांच्या नेतृत्वाखाली तलाठी कार्यालय मनमाड येथे देण्यात आले .याप्रसंगी उपाध्यक्ष सुरेश लोढा,दादा बंब,मनोज जंगम ,अनिल गुंदेचा,कॅटचे प्रतिनिधी कल्पेश बेदमुथा, नवीन बारसे ,अमोल बोगावत आदी उपस्थित होते.