मनमाड – वीज वितरण कंपनीच्या कर्मचा-याला दोन हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वरिष्ट तंत्रज्ञ भगवान भाऊसाहेब गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदारांचे नातेवाईकांनी शेतीसाठी वीजेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे कोटेशन दाखल केले होते. २९ सप्टेंबर रोजी तक्रारदार यांचेकडे सदरचे कोटेशन मंजूर करण्याकरिता दोन हजार रुपये व ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर पाच हजार रुपये अशी एकूण सात हजार रुपये लाचेची केली होती. त्यातील दोन हजार रुपये घेतांना तो सापळयात अडकला.