मनमाड – गवळी समाज आणि दुध उत्पादकांनी पाडव्याच्या दिवशी रेड्याच्या टक्करचे आयोजन केले होते. गेल्या अनेक वर्षीची ही परंपरा आहे. या टक्करीसाठी मालेगाव, निफाड.येवला येथून रेडा मालकांनी त्यांचे रेडे स्पर्धेसाठी उतरवले होते. त्यामुळे ही टक्कर लक्षवेधी ठरली. काही रेड्यांच्या झुंजी व त्यांचा संघर्ष थरारक होता. तर काही रेडे मात्र झुंज होण्या अगोदरच पळून गेले. यावर्षी जिंकणा-या रेडे मालकांना ट्रॉफी बरोबरच मोठ्या रक्कमेचे बक्षिस देण्यात आले.या टकरी पाहण्यासाठी लहानांपासून वृध्दां पर्यंत सर्वानी मोठी गर्दी केली होती. शासनाची बंदी असली तरी रेड्याची झुंज मात्र परंपरा असल्यामुळे त्या घेतल्या केल्याचे आयोजक सांगतात. या स्पर्धेसाठी रेड्याला वर्षेभर चांगल्या प्रकारे खाऊ घातले, त्यांची स्पर्धेसाठी तयारी केली जाते. त्यामुळे या टक्करी बघणे रोमांचकारी असते.