मनमाड – नामको बँकेच्या मनमाड शाखेत स्कँनिंग मशीन बसवण्यात आली याचा शुभारंभ भाग्यलक्षमी पतसंस्थेचे संचालक प्रदीप बोगावात यांच्या हस्ते करण्यात आला. या स्कॅनिंग मशीनने खातेदारांची क्लेरिंगसाठी आलेले चेक स्कॅन करून लवकरात लवकर खात्यात जमा होणार आहेत. या संधीचा सर्व खातेदारांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे अवाहन नामको बँकेचे संचालक सुभाष नहार यांनी केले. या कार्यक्रमा प्रसंगी प्रकाश गवळी, कल्पेश बेदमुथा, प्रेमचंद बेदमुथा, शाखा सल्लागार अख्तर शेख, शाखा अधिकारी जोशी, सचिन छाजेड, शरद बोडके, आतिष भाबड, विकी टर्ले उपस्थित होते