म️नमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय ,मनमाड.येथे द्वितीय सत्राच्या नियोजनाबाबत ऑनलाइन पालक-शिक्षक सहविचार सभा कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महाविद्यालयात द्वितीय सत्राच्या शुभारंभासाठी आवश्यक त्या कार्यवाहीचे नियोजन करण्यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ .बी.एस.जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली.
शासनाने व संस्थेने निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी या वर्गांचे द्वितीय सत्राची शाळा भरवण्यासाठीचे नियोजन करणेबाबत सहविचार सभेत शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांवर विचार विनिमय करून महाविद्यालयाने, शिक्षकांनी व पालक- विद्यार्थी यांनी पूर्वतयारीबाबत नियोजन करण्यात आले. आपल्या ऑनलाइन अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मा.डॉ . बी.एस .जगदाळे यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेण्यात येणाऱ्या हमीपत्राबद्दल व शासन परिपत्रकात नमूद केलेल्या नियमांचा आढावा घेतला.प्राचार्य डॉ.बी .एस.जगदाळे यांनी केलेल्या मार्गदर्शनांतर्गत द्वितीय सत्राच्या कार्यवाहीचे नियोजन व विद्यार्थ्यांना अध्यापन करणेबाबत वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमानुसार महाविद्यालयाने तयारी केलेली आहे द्वितीय सत्राच्या कार्यवाहीचा एक भाग म्हणून महाविद्यालयातील इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिक्षकांसह अन्य सर्व विषय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेंट झेवियर कोविड सेंटरमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. शिक्षिकांनी स्वेच्छेने स्वतःची कोविड चाचणी करून घेतली.
अशाप्रकारे महाविद्यालय २३ नोव्हेंबर पासून शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांच्या आधारे चालू करणे बाबत नियोजन करण्यात आले. ऑनलाइन सहविचार सभेचे प्रास्ताविक उपप्राचार्य सौ .ज्योती राजेंद्र पालवे(बोडखे) यांनी केले व पर्यवेक्षक व्ही.आर. फंड यांनी ऑनलाइन सहविचार सभेसाठी उपस्थित असलेल्यांचे आभार मानले तसेच या ऑनलाईन सहविचार सभेसाठी मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.