मनमाड – केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. तर शहरी भागात समीश्र प्रतिसाद होता. कृषी कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मनमाड येथे किसान सभा,काँग्रेस यांनी मोर्चा काढून पुणे-इंदौर महामार्गावर रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. नांदगाव येथे सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्ता रोको आंदोलन केलेे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे प्रहार संघटने तर्फे गावात शेतकरी एकत्रित येत दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या. यावेळी केंद्र सरकारचा पुतळा करून त्याला चपला आणि कांद्याच्या माळा घालत निषेध नोंदवला..