मनमाड – मनमाड शहरातील एकात्मता चौक येथे बेजबाबदार राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणा देऊन अवाजवी वीज बिलाची होळी करण्यात येऊन तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे यांनी ढोंगी महाविकास आघाडी सरकारने सर्व वीज ग्राहकांचा विश्वासघात केला असून जर वीज ग्राहक ना न्याय मिळाला नाही तर भाजपा आणखी तिव्र आंदोलन उभारले असा इशारा दिला. यावेळी राज्यसरकार वर जोरदार टिका करण्यात आली. व्यापारी आघाडी जिल्हा चिटणीस सचिन लुणावत यांनी या अवाजवी विज बिला मुळे शेतकरी व्यापारी व कामगार त्रस्त झाले असल्याचे सांगितले. नितीन परदेशी, उमाकांत राय, पंकज खताळ, अकबर शहा यांनी देखील या वीज बिल संबंधित तक्रारी यावेळी मांडल्या.
या वीज बिल होळी आंदोलनास नीलकंठ त्रिभुवन कांतीलाल लुणावत, अपंग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बुरहान भाई शेख, मकरंद कुलकर्णी, भाजपा अल्पसंख्यक आघाडीचे ज़लील अन्सारी, व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष अमित गोगड़, डॉ सागर कोल्हे, सचीन कांबळे, आशीष चावरिया कुलदीपसिंग चोटमुरादी, मनोज जंगम, बुढणबाबा शेख, आनंद काकड़े नारायण जगताप, दीपक पगारे, धीरज भाबड, प्रमोद जाधव, रूपेश लोढा, किरण उगलमुगले, आकिम शेख, कमलेश कलापुरे, शाबीर तांबाेळी, सतेश चौधरी आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थितीत होते. या संपूर्ण आंदोलनचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी सरचिटणीस नितिन परदेशी यांनी केले.