मनमाड – केवळ एका दिवसापुरतेच कार्यक्रम घेऊन स्त्रियांसमोरचे प्रश्न सुटणार नाही. महिला सबलीकरण करायचे असेल तर दीर्घकालीन उपक्रम राबवावे लागतील असे प्रतिपादन छञपती शिवाजी चौक पोस्ट कार्यालयातील सब पोस्ट मास्तर सौ.अंजली कुलकर्णी यांनी केले.
मनमाड पोस्ट कार्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी सौ. कुलकर्णी बोलत होत्या. महिलांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्टात गुंतवणूक करावी असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी सब पोस्ट मास्तर बाळासाहेब खैरनार , महिला अल्पबचत प्रतिनिधी , पोस्ट कर्मचारी वृंद व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अंजली कुलकर्णी , सौ. हेमलता पंकज वाले, विजयालक्ष्मी कुमारी व रेखा भालेराव उपस्थित होत्या. व्यासपीठावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. अल्पबचत महिला प्रतिनिधी सौ. ऊज्ज्वला विनय पाठक , सौ. आशा प्रदीप गुजराथी , सौ. रेवती हर्षद गद्रे , सौ. लीला देवराम सदगीर, सौ. मनीषा संजय मेंगाणे , सौ. सत्यभामा मकवाने व सौ. रेवती सुमंत जोशी आदी महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रास्तविक व आभारप्रदर्शन कवी प्रदीप गुजराथी यांनी केले.